शासनमान्य योग पदविका अभ्यासक्रमाचे १२ ऑगस्टला उद्घाटन

Edited by:
Published on: August 08, 2023 20:50 PM
views 119  views

कुडाळ : श्री सदगुरू भक्त सेवा न्यासच्या वतीने सुरू करण्यात येणार्या  शासनमान्य योग पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन शनिवार दि 12 ऑगस्ट रोजी  माड्याची वाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व श्री श्री श्री 108 महंत श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे राकेश केसरकर व केंद्रप्रमुख तथा योग शिक्षक आनंद सावंत यांनी दिली.

कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र संयोजक प्रथमेश परब, केंद्र संयोजीका केसर वानीवडेकर, गिरीधर गावडे, शैलेश परब, पंकज कामत, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. 

यावेळी राकेश केसरकर यांनी सांगितले की,  श्री सदगुरू भक्त सेवा न्यास ही संस्था श्री गावडे महाराज यांनी प्रस्थापित केली. संस्थेच्या माध्यमातून श्री गावडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  2016 रूग्ण सेवेसाठी रूग्ण वाहीका दिली, अन्न धान्य वाटप, 40 शाळेतील 30 मुलांना दत्तक घेण्यात येवुन त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च करण्यात आला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनकल्याण महायाग 218 साधुच्यां उपस्थितीत करण्यात आला. कोरोना काळात ही सामाजिक बांधिलकीतुन बांदा येथील  प्रवाशांना अन्न धान्य दिले, सर्व सामान्यांना अन्न धान्य तसेच इतर साहीत्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात   रोजगार निर्मिती केंद्र बनावे या करीता गावडे महाराज यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असुन आता  लवकरच शासनमान्य योग पदविका अभ्यासक्रमाचे नविन पर्व  गावडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करीत आहोत. योग  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योगाला फार महत्त्व दिले आहे.  त्यांच्या प्रेरणेने ही हा अभ्यासक्रम सुरू करून 100 योग शिक्षक तयार करणार आहोत.  

      

यावेळी आनंद सावंत यांनी सांगितले की, शनिवार दि 12 ऑगस्ट रोजी माड्याची वाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे  पुरुषोत्तम यागाचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी दुपारी 51 लाख जप सांगता होणार आहे. त्यानंतर  या पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन होईल.

      

यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत हा शासनमान्य योग पदविका अभ्यासक्रम  तीन वर्ष  कालावधीचा आहे. 100 विद्यार्थी संख्या असुन प्रत्येक रविवार वर्ग चालणार आहेत. शास्त्रोत पध्दतीने योगाभ्यास शिकवुन योग शिक्षक ही पदवी देण्यात येणार. तसेच  योगा बरोबरच शरीर शास्त्र, मेडिकल योग यांचे ही मार्गदर्शन तज्ञ डाॅक्टर, तज्ञ योग शिक्षकांकडून मिळणार आहे.  जिल्ह्यात योग शिक्षक पोहचविण्याचे कार्य या संस्थेने हाती घेतले आहे असे ही त्यांनी सांगितले.