सावंतवाडी न्यायालयातील ई-फायलिंग - फॅसिलिटी सेंटरचा शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 14:54 PM
views 181  views

सावंतवाडी : सावंतवाडी न्यायालयात महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल व एआयआर यांच्या माध्यमातून ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी दिवाणी न्यायाधीश श्रीमती सुतार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


न्यायालयाच्या परिसरातच ई फायलिंग सेंटर सुरू होतेय, ही बाब स्तुत्य आहे. याचा अधिकाधिक लाभ घेऊन दावे ई फायलिंगद्वारे दाखल करा असे आवाहन सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश डी. बी. सुतार यांनी केले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. जे. कुंभार उपस्थित होत्या.


परिमल नाईक म्हणाले, ई- फायलिंग सुविधा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनकडे विनंती केली होती. न्यायालय परिसरातच ई-फायलिंग सिस्टिम व फॅसिलिटी सेंटर उघडण्यात आले आहे. त्यामुळे वकिलांना आता याचा लाभ होणार आहे. यावेळी अँड. दिलीप नार्वेकर यांनीही  शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड‌. परिमल नाईक, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप नार्वेकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा नीलिमा गावडे, तालुकाध्यक्षा नीता कविटकर, सुभाष पणदूरकर, जिल्हा खजिनदार गोविंद बांदेकर, बी. बी. रणशूर, शामराव सावंत, संदीप निंबाळकर, भालचंद्र शेटकर, वर्षा गावकर, माजी तालुकाध्यक्ष पी. डी. देसाई, संदीप सावंतवाडी निंबाळकर, राघवेंद्र नार्वेकर, तालुका उपाध्यक्ष वीरेश राऊळ, खजिनदार स्वप्नील कोलगावकर, दत्तप्रसाद ठाकुर, अभिषेक चव्हाण, सायली दुभाषी आदी उपस्थित होते.