
सावंतवाडी : भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अधिवेशन तयारी अंतर्गत आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महाप्रबोधन शिबीराचे राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते उदघाटन झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीला आकार देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या, समाजसुधारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या महाप्रबोधन शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या ज्वलंत विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करून आयोजकांनी सुरु केलेली ही वैचारिक चळवळ कौतुकास्पद आहे. देशातील बहुजन समाजाच्या दृष्टीने हा काळ अतिशय आव्हानात्मक आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा अशा असंख्य समस्यांचा सामना बहुजन व अल्पसंख्यांक समाजाला करावा लागत आहे. या आव्हानांचा संघटित मार्गातून सामना करण्यासाठी समाजाला मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून आयोजित केलेल्या या चर्चासत्रात सहभागी होताना मला अत्यंत आनंद झाला अशी भावना अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केली.