
देवगड : देवगड तालुक्यातील कुवळे घाडी वाडी येथील अंगणवाडीचे भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कुवळे गावामधे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुवळे घाडीवाडी येथील नवीन बांधलेल्या अंगणवाडी केंद्राचे भाजप जिल्हा चिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
कुवळे घाडीवाडी येथील अंगणवाडी बरेच वर्ष भाड्याच्या जागेत भरत होती. त्यामुळे मुलांची गैरसोय होत होती .याची दखल घेऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. यातून सुसज्य अशी इमारत बांधून आज तिचे लोकार्पण करण्यात आले .या इमारतीसाठी घाडी कुटुंबीयांनी दोन गुंठे जागा विनामोबदला उपलब्ध करून दिली. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांचे आभार मानण्यात आले. अशा भावनेतून आणि एकसंघ काम केल्याने गावाचा विकास साधता येतो असे संदीप साटम म्हणाले.
यावेळी कुवळे रेंबवली सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, देवगड भाजप तालुका अध्यक्ष राजू शेट्ये, कुवळे बूथ अध्यक्ष अजित घाडी, युवा अध्यक्ष अमित साटम, मिलिंद साटम, माजी.जी. प.सदस्य सुभाष नार्वेकर, ग्रा.प.सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, सुहास राणे, सौ म्हणयारे, सौ मालणकर, सौ लाड, ज्येष्ठ ग्रामस्थ मनोहर घाडी, तसेच कुवळे गावचे पोलीस पाटील रोहित कदम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालकवर्ग, भाजप शिरगाव विभाग पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते तसेच गावातील मान्यवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.