
कुडाळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आता गरजू रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आज १० बेडच्या अद्ययावत डायलिसिस युनिटचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे किडनीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या डायलिसिस युनिटमध्ये रुग्णांसाठी RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) प्लँट आणि रिप्रोसेसिंग युनिट देखील सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे डायलिसिस प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी होईल.
यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासोबत शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते संजय आग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ संजय वाळके, दादा साईल, दीपक नारकर, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय पडते, राकेश कांदे, आबा धडाम, आना भोगले, संदेश नाईक, राजन भगत यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ही सुविधा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण भर घालणारी ठरणार आहे.