रोटरी कणकवलीचा 5 जुलैला पदग्रहण सोहळा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 03, 2024 14:08 PM
views 76  views

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली मार्फत येत्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा जगदीश राणे यांनी दिली. तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा पदग्रहण सोहळा शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी सायं 6 वाजता भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार असल्याचेही सांगितले. 


रोटरी क्लब ऑफ कणकवलीची नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्ष प्रा. जगदीश राणे, उपाध्यक्ष प्रा. सुप्रिया नलवडे, सचिव ॲड. राजेंद्र रावराणे तर खजिनदार डॉ अमेय मराठे यांची निवड झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रा राणे यांनी दिली आहे. 


प्रा जगदीश राणे यांनी यावेळी रोटरीच्या वतीने येत्या वर्षभरात माता बाल आरोग्य तपासणी, जल व्यवस्थापन, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण, महिला व जेष्ठ नागरिकासाठी शिबिरे, गुंतवणूक साक्षरता अभियान, रक्तदान, अवयवदान, पांढरी काठी व जयपूर फूट अभियान, विद्यार्थी व शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, सार्वजनिक स्वच्छता, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा, यशस्वी उद्योजकांचा सत्कार, स्वयंचलित शुद्ध पेयजल यंत्रणा, इ नियोजित विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.