लोरे नं १ व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 08, 2022 13:57 PM
views 165  views

कणकवली:

लोरे नं.१ ग्रामपंचायततिने नेहमी ग्रामस्थांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत आता  आणखी एक गरुड झेप घेत या

लोरे ग्रामपंचायतीने व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा  मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गंगोचाचाळा मंदिर लोरे नं.१  येथे  कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

यावेळी खास आकर्षन प्रशांत  खनुरकर भारतीय सैन्यातील 109 बटालियन मध्ये कार्यरत भारत श्री सुवर्ण

सर्विसेस मध्ये सुवर्ण आर्मी मध्ये सुवर्णपदक व त्यांच्या सोबत विजय मोरे,भारत श्री मध्ये दोन वेळा मिडेल, सलग सहा वेळा महाराष्ट्र श्री, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार, श्रीशिवछत्रपती पुरस्कार सन्मानित व आंतरराष्ट्रीय खेळाडू व कोच असणारे हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी  प्रमुख उपस्थिती माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग तुळशीदास रावराणे, माजी सभापती पंचायत समिती कणकवली मनोज रावराणे ,लोरे विविध कार्यकारणी सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन सुमन गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष  प्रकाश रावराणे यांच्या उपस्थितीत होणार असून पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी या व्यायामशाळेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच अजय रावराणे यांच्या वतीने करण्यात आले आहे