
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना 876 एव्हढं बहुमूल्य मतदान देत प्रभागातून 428 मतांचं मताधिक्य मिळवून दिले. जनतेनं महायुतीला समर्थन देत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले असं मत माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.
महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. भारती मोरे. सौ.माधुरी वाडकर, मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,शिवसेनेचे सुजित कोरगावकर, विशाल सावंत, उमेश पाटणकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख मंदार पिळणकर, बूथ अध्यक्ष श्याम रेमुळकर, ज्ञानेश पाटकर,हरिष कोटेकर, बाळा वाडकर, सौ. ज्योती कोटेकर, संजय वरेरकर, नेल्सन फेराव, सौ. शिवानी पाटकर, सायली वाडकर यांच्यासहित महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकदिलाने व प्रामाणिक काम केल्याने या प्रभागात मताधिक्य मिळाले असे मत अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त करत सर्व मतदारांचे आभार मानून नवनिर्वाचित आमदार दीपक केसरकर यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.