नारायण राणेंच्या प्रचारार्थ विशाल परब मैदानात

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 16:02 PM
views 97  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप युवा नेते विशाल परब मैदानात उतरले आहेत. सावंतवाडीत डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिला आहे. सावंतवाडी शहरात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विविध ठिकाणी मतदारांच्या भेटी घेत नारायण राणेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, दिलीप भालेकर, आशिष कदम, सत्यजीत देशमुख, सचिन साटेलकर, तेजस माने, केतन आजगांवकर, रवी नाईक यांच्यासह महायुतीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.