
वेंगुर्ला : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञानदानाचे कार्य केलेल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत गुरुपौर्णिमा साजरी केली.
गुरुपौर्णिमेदिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुंची आठवण करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. वेंगुर्ला तालुकास्कूलच्या निखिल घोटगे, स्वप्निल पांडजी, स्वप्निल कोरगांवकर, सोहम भगत, दुर्गेश भगत, राहूल मोर्डेकर, भैय्या गुरव या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शालेय जीवनात शिक्षक म्हणून लाभलेल्या शिक्षकांच्या घरी जात त्यांना गुरुपौर्णिच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
यात मेघा पाटकर, मोहिनी पेडणेकर वि.म.पेडणेकर, राजेंद्र बेहरे, आबा खोत, श्रीराम पिगुळकर या शिक्षकांचा समावेश होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.