
वैभववाडी : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदीला आजपासून सुरवात झाली. तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
तालुका खरेदी विक्री संघाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी केली जाते. यावर्षी आजपासून या खरेदीला सुरवात झाली.आतापर्यंत भात विक्रीसाठी तालुक्यातील एकूण ४४६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ही नोंदणीची मुदत ७ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना भात खरेदीचा हमीभाव क्विंटलला २०४७ रुपये इतका आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून भात विक्री करावी अस आवाहन करण्यात आले आहे. आज झालेल्या भात खरेदी शुभारंभ प्रसंगी चेअरमन प्रमोद रावराणे,व्हा.चेअरमन अंबाजी हुंबे, माजी चेअरमन महेश संसारे,संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, पुंडलिक पाटील,रवींद्र इंदुलकर,उज्वल नारकर,सुहास सावंत,सीमा नानीवडेकर,रंजिता रावराणे, पांडुरंग पाटील,जयसिंग रावराणे, आदी संचालक तसेच शेतकरी गजानन पाटील, दिग्विजय पाटील, रमेश सुतार यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.