
वैभववाडी : वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या विद्यामाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
यनिमित्त सकाळी 11 वाजता धम्म पूजा पाठ, धम्म ध्वजारोहण, तर 11.30 वाजता धम्म रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मच्छिमार्केट अशी निघणार आहे. या रॅलीत मोठया संख्येने आंबेडकर अनुयायी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता अभिवादन सभा, त्यानंतर भोजन, भीम गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या जयंती उत्सवा सर्वांनी हजार राहावे. असे आवाहन तालुका संघांचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळ अध्यक्ष शारदा कांबळे, सचिव रवींद्र पवार यांनी केले आहे.