
सिंधुदुर्ग : कुडाळहून चौकेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने काळसे येथील शेतातून घरी परतत असलेल्या पाच महिलांना धडक दिली होती. या धडकेत रूक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ५०, रा. काळसे) या महिलेचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, डंपर मालक समोर येत नसल्यानं या मृत महिलेच प्रेत ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे. तर भादवी कलम ३०४ डंपर चालक व मालक यांना लावत अटक करावी अशी मागणी मृत महिलेचा मुलगा दिपक काळसेकर यांनी पोलीसांना निवेदनाद्वारे केली असून तोवर डेडबॉडी ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक विजय यादव यांची भेट घेत चर्चा केली आहे. अधिकाऱ्यांना सुचना देऊन आमदार नाईक निघाले असून काळसे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.