ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत आचऱ्यात 'त्या' तिठ्यावर मिळाला मुंडके छाटलेला बकरा..!

उलटसुलट चर्चांना उधाण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 22, 2023 18:34 PM
views 244  views

मालवण  : आचरा मालवण रस्त्यालगतच्या मारुती घाटी फाट्यावर शनिवारी रात्रौ एक मुंडके छाटलेला बकरा अगदी रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आचरा मालवण रस्ता व मारुती घाटी रस्ता असे जेथे तीन रस्ते एकत्रित होतात अशा ठिकाणी आणून टकलेला हा बकरा टाकलेला होता. या रस्त्याने ये जा करणाऱ्याना हा मुंडके छाटलेला बकरा दिसून आला. बकरा टाकलेल्या ठिकाणी कोणतेही रक्ताचे डाग नसल्याने सदर बकरा दुसऱ्या ठिकाणी मारून मग टाकला असावा असा अंदाज वर्तवला जात होता. 

आचरा ग्रामपंचायत निवडूकीचे  पडघम आचऱ्यात जोरात चालू आहेत. निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. मुंडके छाटलेला बकरा  दिसून आल्याच्या  प्रकारानंतर मात्र गावात यावरून उलट सुलट चर्चा सुरू होत्या. नेहमीच आचरा मालवण रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत रेलचेल, वाहतूक चालू असते अशा ठिकाणी असा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.