स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये 'एस. एस.जी. एस. थिंक टँक' अंतर्गत 'इ- पेपर' वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 20:05 PM
views 131  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये 'एस. एस.जी. एस. थिंक टँक' अंतर्गत 'इ- पेपर' या विषयावर कोकणसाद लाईव्ह व दै.कोकणसादचे सावंतवाडी करसपाॅन्डंट विनायक गांवस यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत मार्गदर्शक केलं. इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांना डिजिटल मिडिया व प्रिंट मिडिया याविषयी मार्गदर्शन करताना न्युज चॅनलच काम, लाईव्ह न्यूज लोकांपर्यंत त्वरित कशा उपलब्ध होतात याची माहिती दिली.

वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्या डिजीटल माध्यमातून एक दिवस अगोदर अशा पोहोचतात, लाईव्ह वार्तांकन कसं केलं जातं तसेच वार्ताहराच्या बातमीवर वेगवेगळ्या विभागाकडून कशी प्रक्रीया केली जाते, शेवटी ती कशी पब्लिश होते ही संपूर्ण प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना विशद केली. मिडिया क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. तसेच जर या क्षेत्रात यायचे असेल तर या वयापासूनच अभ्यासू वृत्ती ठेवून चौकस रहाणं व मिळालेल्या संधीचा लाभ करून घेणे या विषयी माहिती दिली. पत्रकारीतेत  काम करताना आलेले अनुभव मांडले. तसेच दिवसभरात त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या अनेक बातम्यांपैकी सर्वात महत्त्वाची बातमी व व इतर सर्व बातम्यांचा क्रम प्राथमिकतेनुसार कसा लावला जातो या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच निराकरण केले. पत्रकारीतेत विषयाचा अभ्यास असण का आवश्यक असतं, लाईव्ह वार्तांकन, मुलाखतींसह बातमी म्हणजे काय ? या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील चौकस बुद्धींन अनेक शंका पत्रकरांपुढे मांडल्या. आर्टीफिशिअल इंटेलिजंसचा पत्रकारीत होत असलेला वापर यासह विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले. त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय सहा. शिक्षिका सौ. जरीन शेख यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. प्राची साळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सौ. सुषमा पालव व सौ. शीला चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित शाळेचे संचालक अँड.रुजुल पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.