
सावंतवाडी : भाजपा बुथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व प्रभारी यांची बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. युवकांकडून मंत्री चव्हाण यांच्यासोबत फोटेसेशन करण्यात आले. याप्रसंगी महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी राजवाडा येथे भाजप युवा मोर्चा तसेच भाजपा बुथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व प्रभारी यांची बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांची देखील प्रमुख उपस्थिती यावेळी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, निलेश राणे व नितेश राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर शिवसेना , भाजप, राष्ट्रवादी व रिपाई महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर आदींसह युवा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.