
सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलविरोधात जिल्हयात मोठं आंदोलन उभारण्यात येत असुन आज त्यासंदर्भात महत्वाची बैठक होत आहे. यावेळी ओसरगाव तलावात जलसमाधी आणि चक्का जाम आंदोलन करण्यासंदर्भात विचारविनीमय होणार आहे. त्यामुळं या बैठकीस मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्यावतीनं करण्यात आलंय. ही बैठक सकाळी 11.30 वाजता टोलनाक्यानजीकच्या NH 66 या हॉटेलमध्ये होणार आहे.