
सावंतवाडी ः शिक्षणाबरोबर शारीरिक व्यायाम, सांघिक भावना दृढ व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या हेतूने शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन ओरोस-सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध खेळ प्रकारात विविध शाळांनी सहभाग घेतला होता. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजतर्फे विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी बुद्धिबळ स्पर्धेत शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १९ वर्षा खालील गटात दिशा विजय परब हिने दुसरा तर समीर मयुरेश पटवर्धन याने चौथा क्रमांक पटकविला.
१७ वर्षाखालील वैष्णवी पुनाजी धुमक हिने प्रथम तर राजेश संदीप विर्नोडकर याने दुसरा क्रमांक पटकविला. त्याचप्रमाणे १४ वर्षाखालील गटात आर्ना गुरुप्रसाद राणे हिने चौथा क्रमांक
पटकाविला.या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शूटिंग व्हॉलीबॉलमध्ये आरपीडी संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आणि जिल्हास्तरसाठी पात्र ठरला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण, प्रसारक मंडळ, सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक व पर्यवेक्षक ए. व्ही. साळगावकर यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.