सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शैलेश परब मैदानात

दोडामार्ग तालुक्यातून सुरू केलेल्या शिवसंवाद अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
Edited by:
Published on: January 21, 2024 11:58 AM
views 348  views

दोडामार्ग : सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या शिवसंवाद अभियानाला दोडामार्ग तालुक्यात जनतेतून उदंड प्रतिसाद  मिळत आहे. विकासाचा मोहजाल सांगणाऱ्या मोदी सरकारने जनतेला  महागाई दरीत लोटल्याने जनता त्रस्त असून स्वार्थासाठी याच लोकांशी जवळीकता केलेल्यांना सर्वसामान्य जनता कधीच थारा देणार नाही, असा विश्वास जनतेतून मिळत असलेल्या पाठिंब्यावर शैलेश परब यांनी व्यक्त केलाय.

दोडामार्ग उबाठा शिवसेनेच्यावतीने कोनाळ व माटणे जि. प. मतदार संघात गाववार शिवसंवाद बैठका घेऊन थेट ग्रामस्थांच्या समस्या, जाणून घेतल्या जात आहेत. वाढती महागाई, केंद्र व  राज्य शासनाची शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण व केंद्र शासनाच्या विविध योजनेतील त्रुटी, राममंदिर आदी बाबत उपस्थित ग्रामस्थांशी या शिवसंवाद अभियानात संवाद साधण्यात येत असून संवाद अभियानाला जनतेतून जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे मत शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी व्यक्त केले आहे. संवाद अभियानात ग्रामस्थांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रश्नांना शैलेश परब, बाबुराव धुरी, संजय गवस आदी पदाधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिल्यामुळे उपस्थितांचे समाधान होत आहे. काही झाले तरी आम्ही कट्टर शिवसैनिक जाधव ठाकरे व उबाठा शिवसेनेशी प्रामाणिक राहणार आहोत अशी माहिती ग्रामस्थानी दिली आहे.

या संवाद अभियानात, मुळस, बांबर्डे, घोडगेवाडी, पाळये, सोनावल, भेकुर्ली, साटेली, आवाडे, भेडशी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, युवासेना ता. प्रमुख मदन राणे, सोशल मीडियाप्रमुख संदेश राणे, महिला उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, सुनंदा धर्णे, जेनिफर लोबो, विभाग प्रमुख संतोष मोर्ये, उप तालुकासंघटक संदेश वरक, उप तालुकाप्रमुख मिलिंद नाईक, आबा सावंत, इस्माईल चांद, मेढे सरपंच सोनाली गवस, सुनील गवस, प्रेमानंद ठाकूर, राजू गावडे प्रत्येक गावात शाखा प्रमुख व बुथ प्रमुख उपस्थित होते. आज महाराष्ट्राला अनेक गंभीर प्रश्नांनी घेरले आहे. यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल,  दिल्लीच्या अदृश्य शक्तींना मोडीत काढायचे असेल तर तर उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व आपण अधिक बळकट केले पाहिजे अशी भूमिका कट्टर शिवसैनिक तळागाळात पटवून सांगत आहेत.