सांगवेत विकास कामाचा शुभारंभ

नळपाणी योजनेचं संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 01, 2023 17:36 PM
views 423  views

कणकवली : सांगवे गावात चार कामांच जि. प. माजी अध्यक्ष  संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत, माजी पंचायत समिती सदस्य स्मिता मालाडीकर, माजी सरपंच मयुरी मुंज, विजय भोगटे, नाना जाधव, ग्राम. सदस्य कैलास सावंत, समीर तावडे, माजी सरपंच महेंद्र सावंत, अशोक कांबळे ,बबन घोंसालवीस, रमेश म्हापणकर, बाबू वाळके व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.. 

यावेळी सांगवे संभाजीनगर वरची वाडी येथे पूरक नळयोजना करणे 13 लाख,  सांगवे शास्त्रीनगर येथे नळपाणी पाईप लाईन करणे 7.50 लाख,  सांगवे शिवाजीनगर कुंभारगाळू येथे जलजीवन मिशन या योजने अंतर्गत  पूरक नळयोजना करणे 24 .50  लाख, सांगवे आंबेडकरनगर तेलंगवाडी येथे विहीर खोली करणे, नळपाणी पाईप लाईन करणे- 25 लाख  या कामाचे उद्घाटन करण्यात आले,