वैभववाडी तालुक्यात बहुतेक ठिकाणी दुरंगी लढत

11 सरपंचपदांसाठी 38 तर 48 सदस्यांसाठी 96 उमेद्वार निवडणुक रिंगणात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 08, 2022 18:08 PM
views 575  views

वैभववाडी : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असुन ७५ सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत.माघार घेण्याच्या दिवशी सरपंच पदाच्या ११ तर सदस्यासाठीच्या  ४४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता ११ सरपंचपदांसाठी ३८ तर ४८ सदस्यांसाठी ९६ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत. सरपंचांसह सदस्य पदासाठी बहुतेक ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. निवडणुकीचे खरे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

  तालुक्यातील १७ ग्रामपचायतीची निवडणुक प्रकिया सुरू असुन ७ डिसेंबरला निवडणुक अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंचपदांसाठी दाखल अर्ज दाखल केलेल्या ५१ पैकी १३ जणांनी नामनिर्देशन मागे घेतले.तर सदस्यांसाठी दाखल केलेल्या २१५ पैकी ४४ जणांनी माघार घेतली.१७ पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.यामध्ये गडमठ अरूळे,निमअरूळे, उपळे ,जांभवडे, तिथवली या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्रामपंचायत सडुरे शिराळे मध्ये सरपंचपदासाठी  दिपक यशवंत चव्हाण, संतोष तुकाराम धामणे, रमाकांत शिवराम राणे,नंदकिशोर बाजीराव रावराणे या चार उमेद्वारांमध्ये लढत होत आहे.तर सदस्यांच्या तीन जागांसाठी सहा जण रिंगणात आहेत.येथील चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. नावळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत असुन प्रणाली प्रदीप रावराणे,सोनल आत्माराम गुरव,सुषमा महेश रावराणे यांच्यात लढत होणार आहे.येथील पाच जागा बिनविरोध झाल्या असुन दोन जागांसाठी चार उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत. करूळ सरपंचपदासाठी महेश चंद्रकांत कदम,नरेंद्र जगन्नाथ कोलते यांच्यात दुरंगी लढत होत आहे.या ग्रामपंचायतीच्या सात जागा बिनविरोध झाल्या असुन दोन जागासाठी चार उमेद्वार रिंगणात आहेत.

 नापणे सरपंचपदासाठी प्रदीप रामचंद्र जैतापकर व शंकर बाबु कोकरे यांच्यात थेट लढत होत आहे.येथील पाच सदस्य बिनविरोध झाले असुन दोन जागांसाठी चार उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत.

तिरवडे तर्फे खारेपाटण सरपंच पदासाठी जितेंद्र गणपत तळेकर,योगेश रमेश पाथरे,रामदास तानाजी घुगरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.येथील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत तर चार जागांसाठी सात उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत. हेत सरपंचपदासाठी कांचन मधुकर कांबळे,सुरेखा जितेंद्र कांबळे यांच्यात दुरंगी लढत होत आहे.पाच जागां बिनविरोध असुन दोन जागांसाठी ४ जण निवडणुक रिंगणात आहेत. कोळपे सरपंचपदासाठी भिकाजी धाकटा नारकर, सुनील काशिनाथ कांबळे, नासीर कमरूद्दीन नंदकर,विशाल बाबला जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे.येथील नऊ जागांसाठी १८ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत.

 नेर्ले सरपंचपदासाठी निलांबरी अरविंद पांचाळ,समीक्षा सागर पांचाळ यांच्यात दुरंगी लढत होत आहे.तर १ जागा बिनविरोध असुन एक जागा रिंक्त आहे.पाच जागांसाठी दहा उमेद्वार आहेत. कुर्ली सरपंचपदासाठी विजया विलास पोवार,प्रणाली प्रकाश राणे यांच्यात दुरंगी लढत आहे.एक जागा बिनविरोध असुन ६ जागांसाठी ११ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत. नानीवडे सरपंचपदासाठी रेखा शांताराम खाडये,माधुरी मधुकर खाडये यांच्यात थेट लढत आहे.येथील चार जागा बिनविरोध झाल्या असुन ३ जागांसाठी ६ उमेद्वार आहेत.

उंबर्डे सरपंचपदासाठी वैभवी विजय दळवी,हिना अब्दुलरहीमान रमदुल,नंदिनी महेश चव्हाण,आसीफा काशिम रमदुल,नमिता किशोर दळवी,तबत्सुम मुत्साफीन पाटणकर या सहा उमेद्वारामध्ये लढत होत आहे.येथील१ जागा बिनविरोध झाली असुन ८ जागांसाठी २२ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत.