कुडाळ तालुक्यात जि.प चे आदर्श ग्रामसेवक सतीश साळगावकर यांचं काम 'लय भारी'

विविध संस्थांनी केला विशेष सन्मान|
Edited by: संदीप देसाई
Published on: April 04, 2023 09:18 AM
views 450  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात कवठी व वालावल या दोन ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवक सतीश श्रीधर साळगावकर यांचा नुकताच 'आदर्श ग्रामसेवक' पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला आहे.

'नवभारत टीम'च्या वतीनं त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अर्थात ग्रामविकासात त्यांनी दिलेल्या विशेष कार्याची दखल त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर ३१ मार्च ला मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा विशेष सन्मानपत्र देऊन ग्रामसेवक साळगावकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2020-21 मध्ये जिल्हा परिषदेने सुद्धा कुडाळ तालुक्याचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन साळगावकर यांचं कामाची दखल घेतली होती.

  कुडाळ तालुक्यात सध्या कवठी ग्रामपंचायतचां नियमित कारभार सांभाळत असताना त्यांच्यावर वालावल ग्रामपंचायत चाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र आपल्या कामाशी प्रामाणिक असलेले व लोकसेवेतून आपल्या कर्तव्याला अधिक महत्त्व देणाऱ्या ग्रामसेवक साळगावकर यांनी या दोन्ही ग्रामपंचायतच्या विकास कामांना तेथील सरपंच व कार्यकारणी सहकाऱ्यांच्या सहकार्याने समान न्याय देण्याचं काम केलं. ते कार्यरत असलेल्या कवटी ग्रामपंचायतने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. कुडाळ तालुक्यात आपल्या कामाची चुणूक दाखवीत आहेत.  म्हणूनच ग्रामसेवक वर यांच्या कार्याचं व त्यांना मिळालेला सन्मानाचा विशेष कौतुक होत आहे.