कणकवलीत भर दिवसा दोन प्लॅट फोडले..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2023 18:22 PM
views 273  views

कणकवली : कणकवली शहरामध्ये असलेल्या रामेश्वर प्लाझा मधील दुसऱ्या मजल्यावर दोन फ्लॅट अज्ञात चोरट्याने भर दुपारी १२ ते १.३० वाजताच्या मुदतीत फोडले आहेत. फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून कपाट फोडून रोख रक्कम आणि काही तोळे सोने चोरीला गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस मिलिंद देसाई, आर. आर. राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच ठसे तज्ञ पथक दाखल झाले आहे.