कणकवलीत 'थाळी कष्टकऱ्यांची, पंगत आपलेपणाची' !

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 16, 2023 14:30 PM
views 261  views

कणकवली : समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील गरजू लोकांना आता मोफत दुपारच्या सत्रात कणकवली थाळी च्या संकल्पनेतून जेवण देण्याचा अनोखा उपक्रम या मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. थाळी कणकवलीची पंगत आपलेपणाची अशी टॅगलाईन या उपक्रमाला देण्यात आली आहे.

कणकवली शहरातील किंवा इतर कुठल्या ही कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असला की या वाढदिवसानिमित्त या व्यक्तीकडून कणकवली ची थाळी मोफत दिली जाणार आहे. समीर नलावडे मित्रमंडळाशी संपर्क साधला की याची नोंदणी करत दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये ही थाळी सुरू राहणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी आर बी बेकरी समोर याकरिता विशेष स्टॉल तयार करून ही थाळी वाटप केले जाणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गरजू लोकांना या उपक्रमाच्या निमित्ताने दुपारच्या वेळी मोफत जेवण उपलब्ध होणार आहे. वाढदिवसाच्या करिता अनेकदा खर्च केला जातो. मात्र या खर्च सत्कारणी लागावा हा उद्देश यामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवलीत समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद येथे बोलत होते.  यावेळी राजू गवाणकर, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, जावेद शेख, हृतिक नलावडे आदी उपस्थित होते. या निमित्ताने कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 200 आल्या मोफत थाळ्या दिल्या जाणार आहेत. याकरिता शंभर थाळी ला 5 हजार तर 200 थाळीना 10 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जी व्यक्ती आगाऊ नोंदणी करील त्याप्रमाणे थाळी दिली जाईल. 5 पुऱ्या, भाजी, डाळ, भात, लोणचे असे जेवण, असणार असून यानिमित्त थाळीमध्ये स्वीट चा समावेश संबंधित व्यक्ती देईल त्यानुसार असणार आहे. ज्या व्यक्तीमार्फत ही थाळी दिली जाणार त्या व्यक्तीचे दोन्ही बाजूने बॅनर लावले जाणार आहेत.

या थाळी च्या नोंदणीसाठी राजू गवाणकर 9422584900, राजा पाटकर 9860380738, पंकज पेडणेकर 9890030289, जावेद 9420257722 या क्रमांकावर व पटवर्धन चौकात गवाणकर काजू बी खरेदी केंद्र या ठिकाणी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. सामाजिक जाणीव  म्हणून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.