चतुर्थी सनात एसटी सेवा ठप्प अधिकारी समोर येईनात प्रवाशी आक्रमक

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 17, 2023 07:37 AM
views 422  views

कणकवली: कणकवली बस स्थानकात एसटीसी सेवा ठप्प झाल्याने प्रवासी आक्रमक झाले. तत्परतेने कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव हे बस स्थानकात दाखल झाले पण एसटीचे कोणतेही अधिकारी समोर येण्यास तयार नसल्याचे प्रवाशांनी सांगत कोणती एसटी आपण सोडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.

 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिकीट मशीन चा सर्वर शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून डाऊन झाल्याने जवळजवळ सहा तास एसटी सेवा संपूर्ण महाराष्ट्रात ठप्प झाली  असल्याचे एसटी कडून सांगण्यात आले. यादरम्यान कणकवली एसटी डेपो 500 ते 600 प्रवासी अडकून पडले होते. पण कणकवली बस स्थानकात कोणीही एसटी अधिकारी समोर न आल्याने प्रवासी संतापले व पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासमोर आपले गाराणे मांडले यादव यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील प्रवासी एसटीचा कोणताही अधिकारी येथे उपलब्ध नाही आणि आम्हाला कोणत्याही सूचना देत नाही असे सांगत संताप व्यक्त करत होते. अखेर सहा तासानंतर ही एसटी सेवा सुरू झाली पण कणकवली बस स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता