
आरोंदा : आरोंदा-सावरजुवा येथे तेरेखोल खाडीत बुधवारी महसुल विभागाने वाळु माफियांवर धडक कारवाई केली. या कारवाईत होडीसह सुमारे चार ब्रास वाळु जप्त करण्यात आली. वाळु उत्खनन करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या झोपड्या ही उध्दवस्त करण्यात आल्या .वाळु काढण्या साठी बेकायदेशीर बांधलेले रँप ही मोडुन टाकण्यात आले. बेकायदेशीर रित्या वाळु उत्खनन कररणारे कामगार मात्र पळुन जाण्यात यशस्वी ठरले .तर वाळु भरलेला डंपर घेवून चालक फरार झाला .तलाठी डी.पी पास्ते यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.तेरेखोल नदी खाडित बेकायदेशीररीत्या गेले काही दिवस वाळु उत्खनन होत असल्याची चर्चा होत होती .