
देवगड : रहाटेशवर गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी इम्रान खान साटविलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रहाटेश्वर ग्रामपंचायतीची ग्राम सभा दिनांक 25 ऑगस्टला झाली. त्यावेळी सरपंच कल्पना कदम उपसरपंच श्रीनिवास गुरव यांच्या सह सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी जळते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेमध्ये विविध विषयासह तंटामुक्त समीतीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी अध्यक्षपदी इम्रान खान साटविलकर यांची निवड करण्यात आली. साटविलकर यांचे ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.