पोलीस अधीक्षकांचं महत्वाचं आवाहन..!

Edited by:
Published on: January 11, 2024 11:20 AM
views 712  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारने जारी केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वाहतूक संघटनांकडून स्टेअरिंग छोडो आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आवाहन केले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधित होईल असे कृत्य करू नये. रास्ता रोको, वाहतूक चालकांना जबरदस्तीने आंदोलनात सहभागी करणे अशी कृत्य करण्यात येऊ नयेत, वाहतूक हि अत्यंत महत्वाची सेवा असून ती विस्कळीत झाल्यास सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या करीता सर्व वाहन चालक मालक संघटनांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलय.