वन्यजीवांचे महत्त्व मानवासाठी महत्त्वाचं

वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचं प्रतिपादन
Edited by: रुपेश पाटील
Published on: October 13, 2022 13:23 PM
views 243  views

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 'वन्यजीव सप्ताह' साजरा केला. यावेळी "वन्यजीवांचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. वनांविषयी व प्राण्यांविषयी प्रेम निर्माण हावे'', असे मनोगत सावंतवाडी तालुका वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, शासनाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर आपण वन्य जीव सप्ताह म्हणून साजरा करतो, तसेच जनजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा कीटक, पक्षी, वन्यजीव यांच्या अधिक संख्येमुळे निसर्गाचे समतोल राखले जाते. वन्यजीव जीवंत असताना मानवाला उपयोगी तसेच त्यांच्या मृत्यूनंतरी आपणाला खत मिळते. गरजा मर्यादीत ठेवण्यासाठी वृक्ष तोड थांबविणे आवश्यक आहे. परिसंस्था टिकवणे हे आपल्या हातात आहे. असे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर म्हणाले.


यावेळी ७वी ते ११वीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य कल्पना बोवलेकर यांनी स्वागत केले.

वनपाल प्रमोद राणे, राजेश गुडेकर, सुनिल राऊळ, सी.टी बंगाळ नेत्रा चव्हाण, उमेश राऊळ, दीप्ती सावंत, प्राची ठाकूर, , वनकर्मचारी उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.