
देवगड : हिंदू जनजागृती समितीचे देवगड यांच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तात्काळ लागू करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे,भाजपा शहराध्यक्ष वैभव, करंगुटकर,नगरसेविका तन्वी चांदोसकर, कल्पना शाकाहार, निनाद देशपांडे, भाजपचे दयानंद पाटील,जयेश शंतनु खाडिलकर, महेश पाटोळे, दर्शना कुलकर्णी, आनंद मोंडकर, अशोक करंगुटकर, प्रभाकर कदम, मोहन पाटील, ममता कदम, विद्या मोंडकर, अनंत परुळेकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, एक-दोन नव्हे तर हजारो हिंदू मुलींना खोटी ओळख वापरून, प्रेम/विवाहाच्या बहाण्याने फसवले जाते. अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाद्वारे किंवा ड्रग्सच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जात. नुकतेच नोव्हेंबर २०२५ मध्ये कोल्हापुर इचलकरंजीमधील ६ वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर ५८ वर्षीय धर्माध मुसलमानाने लैंगिक अत्याचार केले. तसेच कोल्हापुरातील शाहुवाडीत १४ वर्षीय हिंदू मुलीवर मुसलमान मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमधून हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक, लैगिंक अत्याचार, धर्मांतर, जबरदस्तीने विवाह केले जातात.
आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे की, लहान मुसलमान मुलाच्या हातावर त्रिशूळ व ऑमचे चिन्ह गोंदवल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. जेणेकरून तो मोठा झाल्यावर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करेन. म्हणजे गुन्हेगार व षड्यंत्री लोक किती पुढचा विचार करून नियोजन करत आहे, हे लक्षात येते.एकूणच 'लव्ह जिहाद' हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निघृण हत्या, मानवतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. हे विविध माध्यमांतून अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे आता शासन, पोलीस आणि समाज या तिघांनी मिळून हिंदु भगिनींच्या रक्षणाचा दृढ संकल्प करण्याची वेळ आली आहे. राज्यात तात्काळ कठोरतम 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' लागू करणे हीच आपल्या लेकी, बहिणी, मातेच्या सुरक्षेची हमी असेल !, असे निवेदनात म्हटले आहे.










