
दोडामार्ग | लवू परब : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय इमारतीला लागलेली गळती आणि अन्य परिस्थिती 'कोकणसाद LIVE' ने चव्हाट्यावर आणली होती. याचीच दखल आरोग्य यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत इमारतीच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग इमारतीची दयनीय अवस्था, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, या सर्व बाबींकडे शासन व लोकप्रतिनिधी यांच झालेलं दुर्लक्ष, त्यामुळे दोडामार्ग आरोग्य यंत्रणेला वाली कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जातं होता.
आरोग्य विभागाने वारंवार दुरुस्ती संदर्भात बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. याचीही कोकणसादने दखल घेतली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ग्रामीण रुग्णालयात पाहणी करून वरिष्ठ पातळीवर व्यवहार केला. त्या नंतर या रुग्णालयाच्या दुरुस्तीला प्रत्यक्ष सुरवात झाली.
स्टाफ कधी भरणार..?
दरम्यान, रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती सुरु झाली. पण याच ग्रामीण रुग्णालयात अपुरा स्टाफ डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी याठीकाणी नसल्याने या ठिकाणी रुग्ण सुद्धा यायला बघत नाहीत. त्यामुळे याचीही वरिष्ठ पातळीवर शासनाने दखल घेऊन या ठिकाणी अपुरा असलेला स्टाफ लवकरात लवकर भरावा अशी मागणी जनतेकडून केली जातं आहे.