
देवगड : हवामानात होणाऱ्या सततच्या बदलाचा परिणाम येथील आंबा बागायतींवर होत असून रात्रीची थंडी आणि दिवसाचा उकाडा वाढलेला दिसत आहे. हिवाळ्यातील दव आणि तापमानातील घसरण आंबा मोहरासाठी अत्यंत महत्त्वाची असते. वातावरणातील सततच्या बदलाचा फटका आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसत असून त्यामुळे आंबा कलमे मोहोर आणि फलधारणेवर चिंताजनक परिणाम दिसू लागले आहेत. देवगड भागात बहुतावंशी कलमाना मोहोर तर काही कलमाना पालवी फुटलेली दिसत आहे. मात्र परिसरात आंबा कलमाना नुसता मोहोर फुटलेला दिसत आहे.त्यामुळे मोहोराला फलधारण होण्याच चिन्ह कुठे दिसून येत नसल्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंता ग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस खूपच लांबल्यामुळे त्याचा थेट परिणाम आंबाकलम बागायतीवर झाल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्यातील मोहोर सामान्यता ऑक्टोबर महिन्यात येतो तो नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झाला. सध्या थंडीचा जोर चांगला असला तरी आंबा बागायतीसाठीचे लागणारे पोषक वातावरण सध्या तालुक्यात दिसत नाही. थंडीचे प्रमाण सध्या जास्त असून दिवसा उष्णता वाढत असल्यामुळे यंदा एक महिना आंबा-हंगाम उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जात असून या तापमानातील बदलाचे थेट परिणाम आंबा उत्पादनावरही होताना दिसणार आहे.
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आंबा कलामाना चांगला मोहर येत असून या मोहराला फलधारणा अद्याप होत नसल्याचे आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. तसेच कोवळ्या फांद्याची अतिजलद वाढ होत असून फ़ांद्या कमकुवत दिसत आहेत. मोहरात नर फुलांचे प्रमाण जास्त, मादी फुले कमी दिसत आहे.प्रकाशसंश्लेषण कमी असल्यामुळे वाढ खुंटते.
सध्या देवगड तालुक्यात आंबा बागायतदार किडी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बागेतील झाडांना कीटकनाशक फवारणी करतांना दिसत आहेत. चक्री किड (Tea Mosquito Bug) ही कोवळ्या कळ्यांवर हल्ला करते त्यामुळे फुलगळति होते.थ्रिप्स (Thrips) या किडीमुळे मोहर व पाने चुरणे, कळी काळवंडणे तसेच फाळधारण कमी होणे आदी समस्या बागायतदाराना भेडसावत आहेत.मिलीबग (Mealy Bug) या किडीमुळे पानांवर चिकट पदार्थ, काळी बुरशी (Sooty mould), देठावर पांढरे कापूससारखे थर तयार होतात. पर्णकर (Leaf Miner) मूळे पानात वाकडे बोगदे प्रकाशनिर्मितीमध्ये घट होते. Anthracnose व Powdery मिळदेव मूळे फुल-कोवळ्या फांद्यांवर काळेजर्द डाग येतात.
दमट वातावरण मुळे कीड-रोग वाढ तसेच आंबा कलमांच्या फळधारणेवर मोठा फटका येऊ शकतो.ढगाळ वातावरणामुळे उत्पादन व गुणवतेत घट होते. पहिल्या टप्प्यातील मोहराला सुरुवात झाली असून दुसऱ्या टप्प्यातील मोहोर 15 डिसेंबर नंतर येऊ शकतो असा अंदाज बागायतदार शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. यासाठी थोड आंबा बागांना पोषण व्यवस्थापन केल्यास त्याचा अनुकूल परिणाम आंबा उत्पादनावर होऊ शकतो.
अमिनो + बोरॉन + मॅग्नेशियम फवारणी केल्यास परागण सुधारतो, फाळधारणेत वाढ होऊ शकते. बागेमध्ये व्यवस्थित साफ सफाई करून बाग स्वच्छ ठेवल्यास त्याचा नक्कीच चागला परिणाम दिसून येऊ शकतो.तसेच संक्रमित फांद्यांची छाटणी,पाण्याचा निचरा योग्य राखल्यास हवा खेळती राहील. अशा पद्धतीची छाटणी करावी. अशी माहिती जामसंडे येथील आंबा बागायतदार मंगेश धुरी यांनी दिली.
"आंबा कलमांवर मोहोर चांगला आला असला तरी मोहराला फलधारणा नाही त्यामुळे कणी सेटिंग होत नसल्यामुळे फलधारणेस उशीर होत आहे, अशी चिंता आंबा बागायतदार विनायक धुरी यांनी व्यक्त केली.












