शिक्षणमंत्र्यांच्या गणपतीच पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन !

भक्तिभावानं दिला एकोफ्रेंडली बाप्पाला निरोप
Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2023 16:39 PM
views 257  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी विराजमान पाच दिवसांच्या गणरायाला शनिवारी भक्तीभावानं निरोप देण्यात आला. घराशेजारी पर्यावरणपूरक पद्धतीने मंत्री केसरकर यांच्या गणरायाच विसर्जन करण्यात आलं. यावेळी भारतानं संपूर्ण जगावर राज्य करण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावी असं साकडं दीपक केसरकर यांनी गणरायाला घातलं.


शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी रात्री मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत गणराला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. पुजा, आरतीसह भक्तिमय वातावरणात गणराच्या मुर्तींच घराशेजारी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. यावेळी पर्यावरणपूरक गणपती आणायचं मोठ्या भावांच स्वप्न होत‌. त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक मुर्तींच पूजन करतो. ही मुर्ती पंधरा मिनीटांच्या आत पाण्यामध्ये विघटन पावते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदुषण होत नाही. गणरायाला भक्तीभावानं निरोप देऊ शकलो याचं समाधान देखील असतं, अर्थात हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. पर्यावरणपूरक गणपतींची प्रतिष्ठापना घरोघरी व्हावी यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तर गणरायाच्या कृपेनं राज्यात पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. उशीरा पाऊस आल्यानं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाईसाठी सरकार विचाराधीन आहे. महिलांसाठी देखील आरक्षण जाहीर झालं आहे. ही कौतुकास्पदबाब आहे. समाजातील घटकांसाठी सरकार कार्यरत आहे. भरीव पगारवाढ शासकीय नोकरीतील सर्वांना दिली आहे. महाराष्ट्र समृद्धीच्या दिशेने जात आहे. त्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून माझ्या हातून विधायक काम घडूदेत अशी प्रार्थना गणराला केली आहे. बुद्धीच्या दैवतानं विद्यार्थ्यांना चांगली बुध्दी देऊन यश द्यावं, जगाला सर्व सेवा देण्याची शक्ती त्यांना द्यावी तसेच  भारतानं संपूर्ण जगावर राज्य करण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावी असं साकडं यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी गणराला घातलं. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, सौ. शितल केसरकर,लालबागचा राजा मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश भोगटे, अमित केसरकर, अशोक केसरकर, युगा केसरकर आदींसह केसकर कुटुंबिय उपस्थित होते.