
सावंतवाडी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सिंधू रत्न जॉब फेअर मध्ये तब्बल वीस हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या जॉब फेअर मध्ये निवड करण्यात आलेल्या तरुण तरुणींना कंपनीकडून तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार असून कुठल्याही प्रकारचा दिखावूपणा या मेळाव्यातून होणार नसल्याची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली. उद्या १२ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदानावर होणारा जाॅब फेअरच्या बाबत पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते.
यावेळी तेली बोलताना म्हणाले तर जनतेची अपेक्षा गृहीत धरून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आत्तापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणांनी रजिस्ट्रेशन केले आहे बेरोजगार तरुणाला एक चांगली संधी या मेळाव्याच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वासही तेली यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, उपाध्यक्ष संजू परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री, बांदा उपसरपंच जावेद खतीब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, दिलीप भालेकर,केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर,तेजस माने आदी उपस्थित होते.