मसुरेतील 'त्या' कुटुंबियांना निलेश राणेंकडून तातडीने मदतीचा हात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 28, 2024 14:43 PM
views 182  views

मालवण : मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत पाठवून त्या कुटुंबाना धीर दिला. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आर्थिक मदत नुकसानग्रस्त किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. 

मालवण सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गेले काही दिवस पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे मसुरे कावावाडी येथे एक भलेमोठे झाड किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांच्या घरावर पडले होते. यात या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना दिली. माजी खासदार निलेश राणे यांनी त्या कुटुंबियांना तात्काळ मदतीचा हात दिला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे ही मदत पाठवून दिली. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी ही मदत त्या कुटुंबियांकडे सुपूर्द करत निलेश राणे तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला. यावेळी संतोष गावकर, देवेंद्र हडकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, सचिन पाटकर, यशवंत हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर आदी उपस्थित होते. तातडीच्या मदती बद्दल किरण पाटील तसेच इतर आपत्तीग्रस्तांनी निलेश राणे यांचे आभार मानले.