अज्ञानी सुशांत नाईकांनी नेतेपणाचा आव आणू नये

नितेश राणेंच्या टीकेला अरविंद रावराणेंचं उत्तर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 15, 2023 15:48 PM
views 458  views

वैभववाडी : अपुरी माहीती घेऊन उबाठा शिवसेनेचे सुशांत नाईक यांनी वैभववाडीत येऊन आपलं अज्ञान प्रकट केले. तालुक्याच्या विकासाचा खोटा आव दाखवून जनतेची फसवणूक करु नये. या तालुक्याचा विकास आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून झाला आहे. आ.राणेंच्या प्रयत्नाने कोट्यवधींचा निधी तालुक्यासाठी आला. यातून तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. उगाचच नेतेपणाचा आव आणून आ.नितेश राणेंवर टीका करू नये. अन्यथा यापुढे जशास तसं उत्तर दिले जाईल असा इशारा माजी सभापती अरविंद रावराणे यांनी दिला.

   श्री.रावराणे यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुशांत नाईक यांनी आज.नितेश राणेंवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नाईक वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालय, उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या होत्या.त्यानंतर त्यांनी माध्यमाद्वारे आ.नितेश राणेंवर टीका होती. या टीकेला श्री रावराणे यांनी आज उत्तर दिले.

   नाईक यांनी वैभववाडीत येऊन बोलण्याअगोदर मागील अडीच वर्षांचा अभ्यास करणे गरजेचा होता.या कालावधीत ते तालुक्यात किती वेळा आले? त्या काळात रखडलेल्या आरोग्य सुविधा आ.राणे हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नाईक गेलं होते, त्या इमारतीला जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी दहा लाखांचा निधी दिला. तिथे आता सुसज्ज इमारत उभी आहे.तुम्ही सत्तेत असताना काय दिले ते सांगावं? उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघाचे गेले २५ वर्षे मी नेतृत्व करतोय. या भागात झालेली विकास कामेही आ.नितेश राणे यांच्या माध्यमातूनच झाली आहेत. त्या विकासकामांच्या जोरावरच जनता नेहमी आशीर्वाद देत आहे.केवळ कारण नसताना आ.राणेंच्या नावाने नाईक यांनी बोटे मोडू नये.अभ्यास करूनच बोंबलाव अशी खरमरीत टीका रावराणे यांनी केली.

  नाईक यांनी तळेरे-वैभववाडी रस्त्याच्या दुरावस्थेवरूनही टीका केली होती. याला देखील रावराणे यांनी प्रत्युत्तर दिले. या रस्त्यावरून बोलण्याअगोदर याची दुरुस्ती कोणत्या ठेकेदाराने केली ते जाहीर करावे. या रस्त्याच्या दुरवस्थेला नाईक कंपनी जबाबदार आहे असा आरोप देखील केला. या मार्गाच्या नुतनीकरणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून २५०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भविष्यात हा मार्ग निर्धोक होईल.त्यामुळे त्यांची चिंता तुम्ही करू नका असा टोला लगावला.