ग्रा.पं.कडून हे दाखले हवे असतील तर लावावं लागणार एक झाड

मळेवाड कोंडुरे ग्रा.पं.चा अनोखा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: December 24, 2025 15:11 PM
views 40  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत कडून विविध दाखले ग्रामस्थांना दिले जातात. मात्र आता मृत्यू दाखला किंवा विवाह नोंदणी दाखल्या करिता एक झाड लावावे लावावे असा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून सुरू करण्यात आला असून याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच सर्व मिलन विनायक पार्सेकर यांनी केले आहे.

 दिवसेंदिवस वाढत चाललेली वृक्षतोड आणि यामुळे पर्यावरणाचा बिघडणारे संतुलन यासाठी शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा सारखे अनेक उपक्रम राबवले जातात. यालाच हातभार लावावा आणि आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्यवहारे यासाठी सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मुळेवाड कुंड्री कडून एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात यामध्ये प्रामुख्याने मृत्यू दाखला विवाह नोंदणी दाखला करिता अर्जदार लाभार्थ्याला मृत व्यक्तीच्या नावे एक झाड त्याचा फोटो ग्रामपंचायत मध्ये जमा करावा लागणार आहे. तसेच विवाह नोंदणी दाखल्या करिता नवरा व पत्नी यांनी एकत्रित रित्या झाड लावून त्याचा फोटो ग्रामपंचायत मध्ये जमा करावा लागणार आहे. यानंतर दाखला देण्यात येणार आहे.

तरी या नाविन्यपूर्ण उपक्रमात गावातील ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून याही पुढे सर्व ग्रामस्थानी सहकार्य करावे व सातत्याने प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सरपंच सौ. मिलन विनायक पार्सेकर, उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी केले आहे.