
सावंतवाडी : उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांवर गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारे ठाकरे सेनेत आपली स्पेस निर्माण करण्यासाठी राणेंवर टीका करत आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवायला त्या राष्ट्रवादीतून सेनेत आल्या आहेत. राणे कुटुंबियांनी या जिल्ह्यासाठी काय काय केलय याची बाजारात फिरुन अंधारेंनी माहिती घ्यायला हवी होती. राणेंवर टीका हेच तुमचं महाप्रबोधन काय ? निवडणुका आल्या की राणे कुटुंबीयांवर टीका करण हाच सेनेच्या नेत्यांचा धंदा आहे. परंतु, जिल्हा संकट असतो त्यावेळी उद्धव ठाकरे सेनेचे नेते कुठे असतात ? त्यावेळी राणे कुटुंबच जिल्ह्यावासियांच्या पाठिशी उभं रहात अस मत व्यक्त करत राणे कुटुंबीयांवर टीका केल्यास सहन करणार नाही असा इशारा भाजपचे जेष्ठ पदाधिकारी संदीप कुडतरकर यांनी देत अंधारेंनी या पुढे राणेंवर बोलताना तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा आम्हाला सुद्धा बोलता येत हे ध्यानात ठेवाव असा इशारा दिला.
यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १९९० पूर्वीचा जिल्हा व आताची बदललेली परिस्थिती याचा श्रेय केवळ आणि केवळ राणे कुटुंबीयांना जातं.कोरोनाच्या संकट काळात सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे व रत्नागिरीत माजी खासदार निलेश राणे, सौ.निलम राणे यांनी केलेले कार्याला तोड नाही.