सर्विस रोडवर चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यास कारवाई..!

Edited by:
Published on: September 14, 2023 20:24 PM
views 252  views

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील सर्विस रोडवर चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असाल तर कारवाई करण्यात येणार आहे. आज सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस बॉक्स वेल येथे दोन्ही बाजूंच्या सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यास बंदी करण्यात आली असून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराच सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे.

तर ओरोस बॉक्स वेल येथील नो पार्किंग झोन मध्ये गाड्या पार केल्यास त्यावर कारवाई केली जाईल असा इशाराच सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याच्या वतीने गाडी फिरवून प्रसिद्धी देण्यात आली आहे.