सफाई कामगारांसाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू : अॅड. परिमल नाईक

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 11:14 AM
views 130  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सफाई कामगार पगारा पासुन वंचित ही बाब अतिशय गंभीर आहे. कामगारांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत सनदी मार्गाने आवाज उठवणार, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू असं मत जिल्हा वकील संघटना अध्यक्ष व माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले आहे. तर  संबंधितावर आवश्यक कारवाई करावी, प्रशासनाने कामगारांची कुचेष्ठा वेळीच थांबवावी अन्यथा परिणामांना सामोरे जावे असा इशारा अँड. परिमल नाईक यांनी दिला आहे.