निधी कमी पडल्यास स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करेन : नितेश राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 09, 2023 19:29 PM
views 124  views

देवगड : देवगड या माझ्या मतदारसंघातील शिक्षण आरोग्य रोजगार या समस्या प्राधान्याने सुटण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.यासाठी शासकीय निधी वेळ पडल्यास स्वतःच्या खिशातून निधी उपलब्ध करून देईन,असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जामसंडे हायस्कूल येथील प्रिंटर,झेरॉक्स मशीन च्या हस्तांतरण सोहळ्या वेळी आपले मत व्यक्त केले.

आमदार नितेश राणे यांनी संगणक कक्षाची फीत उलगडून कक्षाचा शुभारंभ केला.यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या कामाची प्रशंसा केली गोगटे कुटुंबीयांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.जर आपणाला आधुनिक टेक्नॉलॉजी राबवण्यासाठी कोणत्याही सुविधा हव्या असतील तर मी मदतीला हजर आहे.अशा शब्दात त्यांना आश्वासन दिले.

संस्थेचे अध्यक्ष या नात्याने माजी आमदार ऍडवोकेट अजित गोगटे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की या शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी माझे संस्था पदाधिकारी झटत आहेत.यातून चांगली सुसंस्कारित सुशिक्षित पिढी निर्माण होईल.मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आम्ही स्वअर्थसाहाय्यातून शाळा चालवत आहोत.सर्वांना शिक्षण सक्तीचे असताना शासनाने या त्रुटी दूर करून अनुदानित शाळा केल्या पाहिजेत.असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर सर यांनी केले.आभार जाधव सर यांनी मानले.