
मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME - 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगती वर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक, तसेच इतर राज्यांमधून एकूण 141 संशोधन पेपर सादर करण्यात आले. यामध्ये सिव्हिल विभागाचे -27 ए आय/ आय टी /कॉम्प्युटर विभागाचे- 61, मेकॅनिकल विभागाचे- 28, EXTC विभागाचे -22 आणि इतर विषयांवरील - 3 संशोधन पेपरचा समावेश होता.

उत्कृष्ट संशोधन पेपर विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कॉम्प्युटर विभाग - comparaive Analysis of Heart Risk Detection Model - शेरॉन अब्रिओ, सायन्स विभाग- sodium Hippurate as on Efficient Ligand for Iron - Hippurate Complex Catalysis - सुहास पाटील EXTC विभाग - Radio Frequency Energy Harvesting system - कॅजेटन गोंसलवीस , सिव्हिल विभाग- Assessment of water quality in Sindhudurg district,Maharashtra- विशाल कुशे.
या कार्यक्रमाचे सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनायक भराडी (FAMT रत्नागिरी), डॉ. रावसाहेब ठोंबरे (प्रा. एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली) आणि डॉ. नितीन शिवशरण (संगणक शास्त्र विभागात सहयोगी शिक्षक तज्ञ) त्याच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल, प्राचार्य डॉ. एस. व्हि.ढणाल, उपप्राचार्य सौ.पूनम कदम, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे,प्रा.अनिरुद्ध झांटये, प्रा. हिनाली कोरगावकर, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा.रोशनी वरक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सन्मानित पाहुण्यांमध्ये डॉ. भराडी यांनी पहिली परिषद खास असते. असे संबोधले यातून विद्यार्थी नवीन गोष्ट शिकतात. सादरीकरण कसे करावे, वास्तववादी कसे व्हावे, विज्ञान कशी सादर करावे, बाहेरील पेपरची संरक्षण कसे करावे, याचे शिक्षित प्रशिक्षण म्हणजेच संशोधन पेपर होय. तसेच यावेळी एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी कॉलेजचे प्रा. डॉ. ठोंबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याप्रमाणे प्राध्यापक यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद योगदानाबद्दल सर्वांचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना असेच व्यासपीठ उपलब्ध करून द्या असे सांगितले. तर डॉ.शिवशरण यांनी एम.आय.टी.एम. कॉलेजने जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.व ही परिषद आयोजित केल्याबद्दल मॅनेजमेंटच्या उत्साहाची आणि आयोजकांच्या प्रयत्नांची प्रशंशा केली. तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर साठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले.व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली कुडतडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिरुद्ध झांटये यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी आयोजना बद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विनोद कदम, सेक्रेटरी सौ. नेहा पाल, खजिनदार सौ. वृषाली कदम, संस्थेचे विश्वस्त श्री. केतन कदम यांनी विशेष सर्वांचे आभार मानले.











