LIVE UPDATES

एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदी आयएएस तुकाराम मुंढे

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 12, 2026 10:40 AM
views 245  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिव पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे.  MPSC आंदोलनाबाबत रोहित पवार, मंत्री शिवेंद्रराजेंमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरु होती. सायंकाळी उशीरा मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोंसले आले आणि त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सर्व उपोषण आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी मित्र, मुलामुलींना माझा मनापासून नमस्कार, समितीचे सहकारी यांचे आपण आभार मानतो, आणि समोर येण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानतो असे शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी सांगितले. रोहित दादांनी सांगितले की तुम्हाला सांगितले की कोणीही वेडेवाकडे बोलायचे आहेत. एकामेकांचे शब्द कोणाला वाईट वाटणार नाहीत, कारण, आपण सर्व मराठी आहोत. आपण येथे जगणार आहोत आणि येथे जाणार आहोत. त्यामुळे मला तुमचे काही वाईट वाटणार नाही असेही मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले.