विकासकामांच्या जोरावर मी पुन्हा विजयी होणार - बाळाराम पाटलांचा दावा !

जोरदार शक्तीप्रदर्शनासह दाखल केला उमेदवारी अर्ज, मविआच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती
Edited by: भरत केसरकर
Published on: January 11, 2023 20:37 PM
views 160  views

बेलापूर : कोकण शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटनेचे शिक्षक सेना व टीडीएफ पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण आयुक्त कार्यालय, कोकण भवन सिबीडी, बेलापूर येथे मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार जितेंद्र आव्हाड, रायगडचे खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसेना खासदार  विनायक राऊत, आमदार  भाई जगताप, समाजवादीचे आमदार रईस शेख, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, टीडीएफचे ज्ञानेश्वर कानडे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बाळाराम पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण पुन्हा विजयी होऊ, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या मतदारसंघात गेली सहा वर्षे आपण चांगल्या पद्धतीने काम करत शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले, त्यामुळे शिक्षक बांधव पुन्हा आपल्या गळ्यात विजयाची माळ घालतील, असा दावा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला आहे.

बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असून महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. रायगड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुर्गातून अनिल राणे, गजानन नानचे, काका मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर संघटनेने पाठिंबा देत तेही उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी

व पुरोगामी शिक्षक संघटना (टीडीएफ), महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अधिकृत उमेदवार असून उमेदवारी अर्ज दाखल करताना,

बाळाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी गृहनिर्माण मंत्री आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुनील भुसारा, माजी आमदार धैर्यशील पाटील, मनोहर भोईर, दत्तात्रय सावंत, आमदार रुपेश म्हात्रे, ठाणे मनपा माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, नवी मुंबई मनपा माजी महापौर विठ्ठल मोरे, टीडीएफ संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, बहुजन शिक्षक शिक्षकेतर संसदचे अध्यक्ष अशोक बहिराव, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष मंदार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल मनपा जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत, नवी मुंबई मनपा नगरसेवक करण मढवी, तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.