
सावंतवाडी : मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. २०१४ ला देखील काही झालं नाही. जिल्हा बँकेत मला कोणी फसवलं माहीत आहे. लोकसभेत मॅन ऑफ द मॅच केसरकर म्हंटल गेलं. पण, मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी केल.
ते म्हणाले,आयुष्यभर मी संघर्ष केला. मी तुम्हाला सांगणार नाही पार्टी सोडा. माझा निर्णय झाला आहे. पहिल प्राधान्य माझ्या पक्षाला राहिलं. माझ्या नेत्यांना मी भेट घेऊन सगळं सांगितलं आहे. जीव ओतून पक्षासाठी काम केलं आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोवर तुमची साथ सोडणार नाही. राजन तेली तुमच्या सोबत आहे असं विधान त्यांनी केलं.जोपर्यंत आमदार बदलत नाही तोपर्यंत सावंतवाडीचा विकास होणार नाही. कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो ते वरच्या लोकांना देखील समजलं पाहिजे. केसरकरांकडून पैशाच वाटप होणार आहे. त्यामुळे पैसे घ्या, लक्ष्मीचा स्वीकार करा. पण, आमचं ठरवलंय हे ध्यानात ठेवा असंही श्री. तेली म्हणाले.










