
सावंतवाडी : विरोधी उमेदवार हे महायुतीचे आहे. खरी महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे असले जनता माझ्याच पाठीशी उभी राहिल. मतदारांचे हात आणि आशीर्वाद सोबत असल्याने माझा विजय निश्चित आहे असा दावा अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीची जनता निष्ठेला प्राधान्य देते. निष्ठावंंत उमेदवाराला सावंतवाडीकर साथ देतील असेही त्या म्हणाल्या. येथिल आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
दरम्यान, या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होणार आहे. मतदारसंघाचा मला विकास करायचा आहे. आरोग्य, रोजगारासारख्या प्रश्नाचे, मच्छीमारांचे, शेतकऱ्यांसह महिलांचे प्रश्न सोडविण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांचे समर्थक पुंडलिक दळवी, देवा टेमकर, अँड. नकुल पार्सेकर, हिदायतुल्ला खान,ॠत्वीक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते
घारे म्हणाल्या, या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी मी निवडणूक रिंगणात उभी आहे. आयत्यावेळी आलेल्या महाविकास आघाडीची संधी देण्यात आली. परंतु, गेली अनेक वर्षे मी मतदार संघात काम केले आहे. त्यामुळे येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अँड. नकुल पार्सेकर म्हणाले, मी भाजपचा कार्यकर्ता होतो पण राष्ट्रहीतासाठी कार्यरत असणाऱ्या नेत्यांचा मी समर्थक होतो. आता मी भाजपा पासून दूर आहे. घारेंच्या रूपानं एक पर्याय या मतदारसंघात मिळाला आहे. निष्ठेला प्राधान्य देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत असं मत त्यांनी व्यक्त केल. पुंडलिक दळवी म्हणाले, आजच्या राजकारणात कॉलेज युवकांची गर्दी चिंताजनक आहे. पैशांचा वापर राजकारणात मोठ्या प्रमाणात होत आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सामान्य माणासाला राजकारणात कधीही संधी मिळणार नाही असे श्री. दळवी यांनी सांगितले.