कोकणचा निकाल नेहमीच १०० टक्के याचा मला अभिमान : आ. ज्ञानेश्वर म्हात्रे

Edited by: दिपेश परब
Published on: August 12, 2023 20:42 PM
views 199  views

वेंगुर्ला :  कोकणचा निकाल नेहमीच १०० टक्के असतो याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना त्याचा दर्जा योग्य असला पाहिजे. स्वतःचा ब्रँड तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. अशाप्रकारे व्यवसायाचा मार्ग निवडा की दुसऱ्याला नोकरी द्याल अशी क्षमता तुमच्याकडे निर्माण झाली पाहिजे. हे सर्व करताना आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाल तिथे आई वडील व शिक्षकांना विसरू नका. कारण विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे त्यांचे एकट्याचे नसते तर यासाठी आई वडील व शिक्षक यांनी मेहनत असते हे विसरून चालणार नाही. चुकीचं कृत्य होईल असे काम करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या समाजाचा व देशाचा विकास होईल असे काम करा असे मार्गदर्शन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेंगुर्ले येथे आयोजित कार्यक्रमात केले.


    भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला, कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दहावी - बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ट महाविद्यालय  मुख्याध्यापकांचा वेंगुर्ले स्वामिनी मंडपम येथे सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार म्हात्रे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जेष्ठ नागरिक संघटनेचे श्री. काळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री कर्पे, सचिव गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, एम.जी. मातोंडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत  तांडेल, साईप्रसाद नाईक, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, पप्पू परब, बाळू प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी प्रभाकर सावंत, राजन तेली यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला  मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षणप्रेमी, नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी व वसंत तांडेल यांनी आभार मानले.