
कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुर्ली वसाहत येथे जाऊन प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. वेगवेगळ्या तेरा नागरी सुविधा कशा पद्धतीने ग्रामस्थांना देता येतील यासंदर्भात अधिकारी ग्रामस्थ यांच्यात समन्वयाने चर्चा घडवून आणली.
विस्थापित नवीन कुर्ली गावातील प्रलंबित विकास कामांंबाबत आणि पाटबंधारे खात्याकडून नवीन कुर्ली गाव जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले होते. यावर संयुक्त चर्चा करण्यासाठी नवीन कुर्ली वसाहत येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिकारी श्री पाटील, आंबटपाल कार्यकारी अभियंता श्रीमंगले, पुनर्वसन आणि इतर खात्याचे अधिकारी त्याचप्रमाणे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, प्रशासक सूर्यकांत वारंग, भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्यासह असंख्य भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
13 नागरी सुविधांमध्ये पाटबंधारे विभागाकडून काही प्रश्न अडकलेले होते यावर मनोज रावराणे यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांनी आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत त्यासाठी लागणारा 250 कोटीचा विकास निधी
मंजूर केला असल्याचे सांगितले.अजून निधीचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले.
दरम्यान मनोज रावराणे यांनी स्थानिकांचे प्रश्न मांडताना नवीन कुर्ली वसाहत असे नाव रजिस्टर करून घ्या.6 लोकांचे व्यापारी भूखंड देण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले आहेत ते द्या.65 % रक्कम भरली त्यांना भूखंड दिला आहे मात्र उरलेल्यांना दिला नाही. असे सांगितले, त्यावर मंत्री नितेश राणे यांनी खास बाब म्हणून प्रस्ताव द्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या मी ते मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून करून घेतो. असे सांगितले.
पाटबंधारे विभागाने वसाहतीमध्ये रस्त्यांची कामे करण्यासाठी ना हरकत द्यावी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते करून घेऊ अशाही सूचना यावेळी दिल्या. कुर्ली वसाहती साठी उपकेद्र देता येते काय याची माहिती घेतो आणि देण्यासाठी प्रयत्न करतो. कुर्ली वसाहत गावाची हद्द ठेवून द्या.काही बेसिक प्रश्न राहिले असल्यास मंत्रालय स्थरावर मी प्रयत्न करेन मात्र एक महिन्याच्या आत मध्ये हे प्रश्न सुटले पाहिजेत अशा सूचना दिल्या.