लाज वाटते, या जिल्ह्यात जन्म घेतल्याची ; हेमंत वागळे का संतापले ?

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 15:27 PM
views 685  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कोनशी या गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला किरकोळ आजारपणामुळे २५ जूनला रात्री 11 वाजता बांबोळी गोवा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु, २७ जूनपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. या प्रकाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

जिल्ह्यातील राजकारणी मंडळीमुळेच जिल्हा आरोग्य दृष्ट्या दुर्गम राहिला आहे. त्यामुळेच गोव्यावर अवलंबून राहावं लागतं असून मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा याचना करण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर आल्याची खंत व्यक्त केली आहे.  

याबाबत त्यांनी आपल्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत. दिनांक 25 रोजी आपल्या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोनशी या गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला किरकोळ आजारपणामुळे रात्री 11 वाजता बांबोळी (गोवा)येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले नाही. दिनांक 26 रोजी नातेवाईक पूर्ण दिवस हॉस्पिटलच्या बाहेर थांबले. परंतु, त्यांना कागदपत्र अपूर्ण असल्याचे कारण देत खूप धावपळ करायला लावली. दिनांक 27 रोजी पुन्हा या असे सायंकाळी 7 वाजता सांगितले. आता ते पुन्हा जाणार आहेत.या सर्व घटनेचे श्रेय खास आपल्या सर्व समाजसेवेचे ढोंग आणराऱ्या राजकारण्यांना देऊन त्यांचे खूप खूप आभार मानावे असे वाटते. कारण, आज त्यांनी आपल्या जिल्ह्यात सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल आणले असते तर या कुटुंबाच्या वाट्याला आज कमी दुखः आले नसते. खरंच आज लाज वाटते की आम्ही या जिल्ह्यात जन्म घेतला अशा संतप्त भावना हेमंत वागळेंनी व्यक्त केल्यात.