
मालवण : सर्वे नंबर 22/4/13 मध्ये सीआरझेड कायद्याचा भंग करून करण्यात आलेल्या विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करतं आहे. असे सांगत तारकर्ली येथील बापूजी रामचंद्र चव्हाण, दत्तराज प्रकाश चव्हाण यांनी मालवण पंचायत समिती कार्यालय समोर उपोषण छेडले.
दरम्यान, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे आवश्यक अहवाल एक महिन्यात पाठविण्यात येईल असे पत्र मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी शाम चव्हाण यांनी उपोषण कर्ते यांची भेट घेऊन चर्चेअंती दिले. त्यानुसार उपोषण स्थगित करण्यात आले आहे. याबाबत माहिती गटविकास अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी पंचायत समिती अधिकारी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.